मुंबई -समाज माध्यमावर चिकन खाल्ल्यामुळे कोरोना रोग होत असल्याची माहिती पसरवली जात आहे. ही माहिती अफवा असून, अशी चुकीची माहिती पसरवणाऱ्याची राज्यसरकार गांभीर्याने दखल घेत आहे. तसेच सायबर क्राईमकडे यासंबंधी गुन्हा दाखले करण्याचे आदेश दिल्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. राज्यामध्ये कुक्कुट पालन व्यवसाय चांगला चालत असताना, चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची राज्याला झळ पोहोचत आहे.
चिकन खाल्यामुळे कोरोनो? अफवांविरोधात सरकारकडून गंभीर दखल हेही वाचा -'33 कोटी वृक्ष लागवडीची वस्तुस्थिती समोर येणे गरजेचे, प्रकरणाची चौकशी करा'
केदार म्हणाले, या अफवेमुळे मोठ्या प्रमाणावर 'पोल्ट्री फार्म' शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने काही गुन्हेही दाखल केले आहेत.
राज्यात नवीन खेळाचे धोरण लवकर येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 22 फेब्रुवारीला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दिले जाणार असून खेड्यापाड्यातील मुलांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरुणांना खेळाच्या विभागातून चांगली संधी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी मंत्री केदार म्हणाले.
हेही वाचा -तिरंगा वाचवणाऱ्या 'त्या' बहाद्दराचा राज्य शासनाकडून गौरव