मुंबई - 'पार्टी विथ डिफरन्स' बोलणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना 22 तारखेला 'माझे अंगण माझे रणांगण' असे सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यास सांगितले आहे. हा निव्वळ स्टंट असल्याची टीका शिवसेना नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. मागील आठवड्यात कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी पक्षाची बैठक बोलावली होती. तेव्हा त्यांनी असंतोष न दाखवता काही सूचना केल्या होत्या आणि सरकारनी काही सूचना अंमलात ही आणल्या होत्या मग आताच हा स्टंट का असा सवाल देखील देसाई यांनी उपस्थित केला आहे.
भाजपला दोषच शोधायचे असतील तर सुरतमध्ये मजुरांमध्ये जो असंतोषाचा भडका उडाला आहे तो शमवण्याचा सल्ला त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना द्यावा, असा टोला देखील लगावला आहे. या कठीण परिस्थितीत जनता, सरकार आणि प्रशासन कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी लढत आहे. अशा वेळी आंदोलन करण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी जनतेशी संवाद साधून दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. त्यांची मनातली भीती घालवण्याचा प्रयत्न करावा, असे देसाई यांनी म्हटले.