मुंबई - कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी मदन शर्मा या व्यक्तीला शिवसैनिकांनी जबर मारहाण केली. या शर्मा याची आज आठवले यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मदन शर्मा माजी नौदल अधिकारी असल्याचे बोलले जाते.
या मारहाणीविरोधात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सोमवार (दि. 14 सप्टें.) रोजी सकाळी 11 वाजता समता नगर पोलीस ठाणे येथे अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत.
रामदास आठवले म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तो सत्ताधारी शिवसेना पक्ष सूड बुद्धीने काम करीत आहे. निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा या ज्येष्ठ नागरिकावर शिवसैनिकांनी जबरी हल्ला केला त्या हल्ल्याचे समर्थनही शिवसेनेने केले आहे. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कारवाई पोलिसांनी केली नाही. हल्लेखोर जामिनावर बाहेर आहेत. कंगना राणौतलाही अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राज्यात वातावरण गढूळ झाले आहे. सूडबुद्धीने वागणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी पुढे आली आहे. हे राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, ही मागणी पुढे येत आहे. या मागणीला माझा पाठिंबा असून त्यासाठी आपण केंद्रात प्रयत्न करणार आहे, असेही आठवले म्हणाले.
निवृत्त नौदल अधिकाऱ्यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा केंद्र सरकार कडून मिळवून देण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आपण प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले.
मीही महाराष्ट्राचे ब्रँड
कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, आठवलेंचा शिवसेनेला इशारा - minister ramdas athawale news
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तो सत्ताधारी शिवसेना पक्ष सूड बुद्धीने काम करीत असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.
उद्धव आणि राज ठाकरे, शरद पवार हे महाराष्ट्राचे ब्रॅण्ड आहेत का या प्रश्नावर आपण ही महाराष्ट्राचे ब्रँड आहोत, असे रामदास आठवले म्हणाले. तेव्हा मदन शर्मा यांनी ही उत्स्फूर्तपणे आपण आठवले यांचे फॅन असल्याचे म्हटले. निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या कांदिवली पूर्वेतील ठाकूर कॉम्प्लेक्समधील निवासस्थानी आठवले यांनी भेट देऊन शर्मा यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून उपचार करून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. शर्मा यांच्यावर झालेला हल्ला हा जीवघेणा हल्ला होता. त्या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्याने कलम 307, 326 प्रमाणे गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. मात्र, तशी कारवाई न केल्यामुळे हल्लेखोरांना त्वरित जामीन मिळाला आहे. याबाबत आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -महाराष्ट्रद्रोही भाजपाकडून आता मराठी कलाकारांचाही अपमान - सचिन सावंत