मुंबई -राष्ट्रीय महामार्गांवर होणारे अपघात टाळणे व ते कमी करणे यासाठी गृह व परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी नुकत्याच एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. ‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’ने सरकारला सादर केलेल्या एका अहवालातील आकडेवारीची दखल घेत पाटील यांनी रस्ते आणि महामार्गांवरील अपघात कमी करण्यासाठी एका आठवड्यात कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. अहवालात सुचविलेले उपायांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अंमलबजावणी करण्याच्या सूचना
‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’ने राष्ट्रीय महामार्ग-48 आणि इतर महामार्गांवरील अपघातांच्या बाबतीतील सखोल अभ्यास अहवाल सदर केला आहे. या अहवालामध्ये हे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजनाही सुचविल्या गेल्या आहेत. त्यामध्ये इंजिनियरिंग बाबींमध्ये बदल, आपत्कालीन प्रतिसाद व अवश्यक प्रशिक्षण, उपययोजनांची अंमलबजावणी आदी गोष्टींचा समावेश आहे. परिवहन खात्याला एक कृती आराखडा एका आठवड्यामध्ये बनविण्यास सांगण्यात आले असून या सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
काय आहे अहवाल
‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’ने महामार्गांवर होणाऱ्या अपघातांशी संबंधित डोळ्यात अंजन घालणारी आकडेवारी आपल्या या अहवालातून समोर आणली आहे. या अहवालानुसार, संपूर्ण जगात 1.35 दशलक्ष लोक दरवर्षी मरण पावतात आणि त्यातील सर्वाधिक म्हणजे दीड लाख लोक हे भारतातील असतात. या अहवालात म्हटले आहे की, भारतात दररोज 30 मुले या अपघातांमध्ये मरण पावतात. पुणे-सातारा आणि सातारा-कागल या दोन महामार्गांवरील अपघातांची आकडेवारी या अहवालात सादर करण्यात आली आहे. त्यानुसार विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे पुणे-सातारा महामार्गावर 25 तर सातारा-कागल महामार्गावर 62 अपघात नोंदविले गेले आहेत. पुणे-सातारा मार्गावर 109 आणि सातारा-कागल मार्गावर 205 अपघात हे चुकीच्या लेनच्या वापरामुळे नोंदविले गेले होते. डावीकडून ओव्हरटेक करण्याचे 3 प्रकार पहिल्या महामार्गावर तर 40 दुसऱ्या महामार्गावर नोंदविले गेले. पुणे-सातारा महामार्गावर अनधिकृत पार्किंगच्या 145 तर सातारा-कागल महामार्गावर 99 घटना नोंदविल्या गेल्या आहेत. दुचाकीस्वारांनी हेल्मेट न घालण्याचे अनुक्रमे 103 आणि 160 प्रकार या दोन महामार्गांवर नोंदविले गेले.
मृत्यूंचे प्रमाण 52 टक्क्यांनी कमी
‘झिरो फॅटेलीटी कॉरीडॉर’च्या अंमलबजावणीमुळे सरकारी यंत्रणा आणि ‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’ला मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे महामार्गावरील मृत्यूंचे प्रमाण 52 टक्क्यांनी कमी करण्यात यश आले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-48वर हे प्रमाण 54 टक्क्यांनी कमी झाले तर दिल्लीच्या भलस्वा चौक ब्लॅक स्पॉटवरील मृत्यू शंभर टक्क्यांनी कमी झाले. या सर्वेक्षणामध्ये असेही पुढे आले आहे की, 2019-20 मध्ये तब्बल 125 लोक विविध कारणांमुळे पुणे-सातारा महामार्गावर अपघातांमध्ये मृत्यू झाला. त्यातील काही कारणांमध्ये भरधाव गाडी हाकणे, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, लेन अचानक बदलणे, इंडीकेटर न देणे, हेडलाईट चांगल्या स्थितीत नसणे आदींचा समावेश आहे. ही सर्व करणे ध्यानात घेवून या सर्वेक्षणाच्या माध्यमातून योग्य त्या उपाययोजन सुचवल्या गेल्या आहेत.
पुणे-सातारा मार्गावरील अपघात