महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mangal Prabhat Lodha : ठाकरे सरकारच्या काळातील निर्भया फंडाचे ऑडिट करा - मंगलप्रभात लोढा

खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन निर्भया पथकाच्या वाहनांचा वापर आमदारांकरिता होत असल्याचा आरोप केला. त्यावरुन राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister of State Mangalprabhat Lodha) यांनी ठाकरे सरकारवर पलटवार करित ठाकरे, सरकारने अडीच वर्षात या फंडाचा काय (misappropriation of funds) वापर केला? याचे ऑडिट करून जनतेच्या समोर आणावे, असे आवाहन करीत, आरोपाचे खंडन (refutes Nirbhaya squads allegations) केले.

Mangal Prabhat Lodha
मंगलप्रभात लोढा

By

Published : Dec 12, 2022, 3:58 PM IST

Updated : Dec 13, 2022, 8:53 AM IST

प्रतिक्रिया देतांना मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक निर्माण केले आहे. या निर्भया पथकाच्या गाड्या तसेच निधी (misappropriation of funds) मंत्री आणि आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरला जात असल्याचा आरोप राज्यातील एकनाथ शिंदे आणि भाजपा सरकारवर करण्यात आला आहे. मात्र या आरोपांमध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचा खुलासा (refutes Nirbhaya squads allegations) राज्याचे मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी (Minister of State Mangalprabhat Lodha) केला आहे. तसेच ठाकरे सरकारने अडीच वर्षात या फंडाचा काय वापर केला? याचे ऑडिट करून जनतेच्या समोर आणावे, असे आवाहन लोढा यांनी केलं आहे.

ठाकरे सरकारच्या काळातील ऑडिट करा : घाटकोपर येथे मुंबई महापालिकेच्या एन वॉर्ड अंतर्गत 'माझी मुंबई स्वच्छ मुंबई' या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंगलप्रभात लोढा पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना, जेव्हापासून भाजपाचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यापासून एकही दिवस आरोप केल्या शिवाय गेलेला नाही. ठाकरे सरकारने नानार, मेट्रो, बुलेट ट्रेन यासारखे विकास प्रकल्प थांबवले होते. हे विकास विरोधी सरकार आहे. अराजकता पसरवण्याचे आणि लोकांचे काम होऊ नये, कोणतेही सरकार येथे काम करू नये असे यांना वाटतं. आम्ही याकडे लक्ष देणार नाही, आम्ही काम करत राहू. ऑडिट करण्याची गरज नाही ते खोटे आरोप आहेत. आंदोलन करणे त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात निर्भया फंड नव्हता का? त्यांनी अडीच वर्षात त्याचा काय उपयोग केला? त्याचे ऑडिट करून जनतेच्या समोर आणावे. आरोप करणे सोपे, मात्र काम करणे कठीण असते. अडीच वर्षात त्यांनी काही केले नाही, म्हणून ते आरोप करण्याचे काम करत आहेत.



घाटकोपर मध्ये स्वच्छ्ता अभियान :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत 'माझी मुंबई स्वच्छ मुंबई' हे अभियान सुरू करण्यात आले आहे. यामध्ये 20 लाखाहून अधिक एनजीओ आणि लोक सहभागी झाले आहेत. आयआयटी तसेच स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने आज घाटकोपरमध्ये स्वच्छता अभियान राबवल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली. यावेळी मुंबई स्वच्छ ठेवण्याची शपथ उपस्थितांनी घेतली.

Last Updated : Dec 13, 2022, 8:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details