महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उच्च शिक्षण मंत्र्यांकडून विद्यापीठात 'सामंतशाही'; आशिष शेलार यांचा आरोप - Mumbai University Registrar change

राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून विद्यापीठांच्या स्वायत्तेवर घाला घालण्यात येत असून उच्च शिक्षण मंत्र्यांकडून विद्यापीठात 'सामंतशाही' सुरू आहे. नॅक मुल्यांकन होणार असतानाच सरकारने मनमानी पद्धतीने कुलसचिवांची नियुक्ती केली. यातून सरकारचा अहंकारच दिसून येत आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

Ashish Shelar allegations
आशिष शेलार आरोप

By

Published : Jan 17, 2021, 10:41 PM IST

मुंबई - राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून विद्यापीठांच्या स्वायत्तेवर घाला घालण्यात येत असून उच्च शिक्षण मंत्र्यांकडून विद्यापीठात 'सामंतशाही' सुरू आहे. नॅक मुल्यांकन होणार असतानाच सरकारने मनमानी पद्धतीने कुलसचिवांची नियुक्ती केली. यातून सरकारचा अहंकारच दिसून येत आहे, अशा शब्दांत भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.

हेही वाचा -पोलिसांचा गणवेश बदलण्याच्या मागणीचा विचार करू - गृहमंत्री

मुंबई विद्यापीठाची नॅक मुल्यांकनाची तयारी सुरू असतानाच राज्य शासनाने ८ जानेवारी रोजी अचानक मुंबई विद्यापीठामध्ये नवीन कुलसचिवांची परस्पर नियुक्ती केली. विद्यापीठ कायद्याप्रमाणे कुलगुरूंनी प्रभारी कुलसचिव नेमला असतानाही व कोणतीही अनागोंदी नसतानाही राज्य सरकारने विद्यापीठात पुन्हा ढवळाढवळ केली. कुलगुरूंनी १४ जानेवारी रोजी राज्य सरकारला पत्र लिहून नॅक मुल्यांकन असल्याने आता कुलसचिव बदलल्यास त्याचा मुल्यांकनावर परिणाम होईल हे सांगितल्यावर देखील सरकारने विद्यापीठावर मनमानी करून कुलसचिव थोपला. या बदलाचा नॅक मानांकनावर परिणाम झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील. विद्यापीठाचे सरकारी महामंडळ करण्याच्या दिशेने वाटचाल चालली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सरकारी हस्तक्षेप नको असेच म्हटले आहे. मात्र, अहंकारी ठाकरे सरकारने मनमानी सुरूच ठेवली आहे. हा विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला आहे, असे गंभीर आरोप शेलार यांनी केले.

ठाकरे सरकार आल्यापासून विद्यापीठांच्या स्वायत्तेला धोका

राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून विद्यापीठांची स्वायत्ता अशीच धोक्यात आली आहे. उच्च शिक्षण मंत्री यांनी पदभार घेताच विद्यापीठांकडे आर्थिक हिशेब मागितले होते. त्याला विरोध होताच सारवासारव करण्यात आली. त्यानंतर युजीसी, विद्यापीठ, कुलपती, कुलगुरू, सीनेट यांना डावलून सरकारने अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्याचा निर्णय परस्पर घेतला होता. त्यालाही विरोध झाला व न्यायालयाने, युजीसीने फटकारल्यानंतर परीक्षा घ्याव्या लागल्या. ठाकरे सरकारचा हा कारभार विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा, स्वायत्ता याला इजा करणारा आहे. आता आपल्या मर्जीतील कुलसचिवांच्या नियुक्त्या करून विद्यापीठांवर सरकारने ताबा मिळवला आहे. विद्यार्थी हिताच्या आड येणाऱ्या या निर्णयाचा आम्ही विरोध करतो. आम्ही संघर्ष करू, असा इशारा शेलार यांनी दिला.

हेही वाचा -'तांडव' वेब मालिकेतील दृश्यामुळे भाजप आमदार राम कदम आक्रमक

ABOUT THE AUTHOR

...view details