मुंबई :गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. आता यांच्या तोंडातील अल्सर काढण्यात आला आहे. याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
शरद पवारांच्या तोंडातील अल्सर काढला, तब्येत ठणठणीत - नवाब मलिक - Sharad pawar operation news
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. आता यांच्या तोंडातील अल्सर काढण्यात आला आहे. याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ते रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. दरम्यान, तोंडात एक अल्सर आढळल्याने तो काढण्यात आला. सध्या त्यांची तब्येत चांगली असून ते आता रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. शिवाय देशभर पसरलेल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. ते लवकरच आपले कामकाज पुन्हा सुरू करतील, असे मलिक यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांना पोटात दुखू लागल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात 30 मार्चला दाखल केले होते. त्यावेळी लॅप्रोस्कोपी ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर 12 एप्रिलला गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ब्रीच कँडी हॉस्पिटल मधील डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली. यापूर्वीची शस्त्रक्रिया ही डॉ. अमित मायदेव यांनी केली होती. त्यानंतर तिसरी शस्त्रक्रियाही झाली होती. याची माहितीही नवाब मलिक यांनी दिली होती. दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर पवारांचा वृत्तपत्र वाचतानाच एक फोटो समोर आला होता.