महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nawab Malik on Narayan Rane : आम्ही ठरवलंय आता लढायचं - मंत्री नवाब मलिकांचे नारायण राणेंना प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) सांगत आहेत, मातोश्री वरील चार लोकांना ईडीची नोटीस जाईल. महाविकास आघाडी सरकारमधील नेते, मंत्री, मुख्यमंत्री घाबरणार नाहीत. आम्ही सर्वांनी ठरवले आहं की, आता याविरोधात लढायचं, असा इशारा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) दिला आहे.

nawab malik
नवाब मलिक

By

Published : Feb 19, 2022, 12:35 PM IST

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) सांगत आहेत, मातोश्री वरील चार लोकांना ईडीची नोटीस जाईल. महाविकास आघाडी सरकारमधील नेते, मंत्री, मुख्यमंत्री घाबरणार नाहीत. आम्ही सर्वांनी ठरवले आहं की, आता याविरोधात लढायचं, असा इशारा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) दिला आहे. ( Nawab Malik reply to Narayan Rane )

आम्ही घाबरणार नाहीत -

केंद्रीय मंत्री नारायण राणे सांगत आहेत, मातोश्री वरील चार लोकांना ईडीची नोटीस जाईल. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये आणि लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा धंदा आता चालणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणेचा कोणी कितीही दुरुपयोग केला. तरीही महाविकास आघाडी सरकारमधील नेते, मंत्री, मुख्यमंत्री घाबरणार नाहीत. आम्ही सर्वांनी ठरवल आहे. की, आता याविरोधात लढायचं, असा इशारा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्ष आणि नारायण राणे यांना दिला आहे. आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.

हेही वाचा -Ajit Pawar on Reservation : 'मराठा आरक्षणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा'

काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खळबळजनक ट्विट करून अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या नसून खून झाला आहे. तसेच दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार करून तिचीही हत्या करण्यात आली असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. मात्र, हे सर्व महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणायचा प्रयत्न असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details