मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे, अशी टीका राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केली होती. मात्र, राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी कात्रजचा घाट दाखवला. आता होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला शरद पवार हे काशीचा घाट दाखवतील, असा पलटवार अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. ( Minister Nawab Malik reply to Devendra Fadnavis ) देवेंद्र फडणीस यांनी साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर जाऊन कोणाचे कोठे किती आमदार आहेत? हे तपासावे. शरद पवार हे राज्यात मुख्यमंत्री असताना त्यांचे राज्यात 25 आमदारही निवडून येत नव्हते, असा टोलाही नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
गोव्यात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमुळे आघाडीत विघ्न -
महाराष्ट्र राज्य प्रमाणेच गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र, गोव्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच गोव्यामध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात येत नाही. मात्र उद्या शिवसेनेचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मिळून गोव्याच्या आघाडीबाबत घोषणा करतील, असे संकेत नवाब मलिक यांनी दिले आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच गेल्या वेळेस काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावं लागलं याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. तसेच मणिपूरमध्ये काँग्रेससोबत तर उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पक्ष सोबत राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
उत्पल पर्रीकर बाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर उद्या चर्चा -