महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शेतकरी प्रश्न, कोरोना लससाठी पंतप्रधानांनी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवावे' - nawab malik demand for parliament session

काँग्रेस नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी हिवाळी अधिवेशनासंदर्भात केलेली मागणी योग्यच आहे. हिवाळी अधिवेशन न ठेवणे तसेच प्रश्नोत्तराचा तासही गुंडाळणे हे लोकशाहीसाठी हितकारक नाही. विरोधक आणि शेतकरीदेखील 2 दिवसांच्या संसदीय अधिवेशनाची मागणी करत आहे, असेही मंत्री नवाब मलिक म्हणाले.

minister nawab malik
नवाब मलिक

By

Published : Dec 3, 2020, 5:25 PM IST

Updated : Dec 3, 2020, 7:58 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी प्रश्वांवर आणि कोरोना लसीबाबत चर्चा करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवावे, अशी मागणी अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केले आहे.

मंत्री नवाब मलिक अधिवेशनाच्या मागणीबद्दल बोलताना.

अधीर रंजन चौधरी यांची मागणी रास्तच -

दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी हिवाळी अधिवेशनासंदर्भात केलेली मागणी योग्यच आहे. हिवाळी अधिवेशन न ठेवणे तसेच प्रश्नोत्तराचा तासही गुंडाळणे हे लोकशाहीसाठी हितकारक नाही. विरोधक आणि शेतकरीदेखील 2 दिवसांच्या संसदीय अधिवेशनाची मागणी करत आहे, असेही मंत्री नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिक यांची प्रतिक्रिया.

हेही वाचा -१४ आणि १५ डिसेंबरला मुंबईत होणार विधिमंडळाचे अधिवेशन

आरोग्य सचिवांनी सांगितले आहे की, त्यांनी लस सर्वांना दिली जाईल असे कधीच म्हटले नाही. ती विनामूल्य मिळणार का? हादेखील प्रश्न आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी प्रश्वांवर आणि कोरोना लसीबाबत चर्चा करण्यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशन बोलवावे, अशी मागणी मंत्री मलिक यांनी केली.

अभिनेते रजनीकांत यांच्याबद्दल मलिक यांची प्रतिक्रिया.
Last Updated : Dec 3, 2020, 7:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details