मुंबई -कोंबडा आरवला नाही तरी सकाळ व्हायची थांबत नाही आणि झोपला तरी सकाळ होण्याचे थांबत नाही त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखी अवस्था झाली असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
माझ्यामुळे इतर पक्षाचे लोक बाहेर फिरायला लागले असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला जोरदार प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी दिले आहे. कोंबड्याला वाटत मी आरवलो नाही तर सकाळ होणार नाही. पण, तसे होत नाही. कोंबडा झोपला तरी सकाळ होते हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यायला हवे, असेही नवाब मलिक म्हणाले.
शरद पवार असतील किंवा इतर मंत्री शेतकरी अडचणीत आल्यावर त्यांना धीर देण्यासाठी शेताच्या बांधावर जावून धीर देणे ही आमच्या पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची अवस्था त्या कोंबड्यासारखी झाली आहे, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.
कोंबडा आरवला नाही तरी सकाळ व्हायची थांबत नाही; नवाब मलिक यांचा फडणवीसांवर पलटवार - Mumbai political news
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तुलना कोंबड्याशी केली आहे. ते म्हणाले, कोंबडा आरवला किंवा नाही त्यामुळे काही फरक पडत नाही. सकाळ ही होतच असते, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
![कोंबडा आरवला नाही तरी सकाळ व्हायची थांबत नाही; नवाब मलिक यांचा फडणवीसांवर पलटवार नवाब मलिक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9236340-672-9236340-1603117534446.jpg)
नवाब मलिक