महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'भाजपचे 'मिशन लोटस' जनतेने हाणून पाडले' - अंल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक

दिल्लीच्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. याबाबात भाजप मंत्र्यांच्या प्रतिक्रियेला अंल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी प्रतिउत्तर दिले.

मंत्री नवाब मलिक
मंत्री नवाब मलिक

By

Published : Feb 11, 2020, 7:06 PM IST

मुंबई- जनतेनेच भाजपचे मिशन लोटस हाणून पाडला आहे. भाजपच्या मिशन लोटस ऐवजी आता भाजपचेच अनेक आमदार-खासदार आमच्या संपर्कात आहेत. चंद्रकांत पाटील यांना अनेक स्वप्न पडतात. सुधीर मुनगंटीवार यांची 'गोड बातमी' कधी येणार हे माहीत नाही. या सर्वांना उपचार घेण्याची गरज असल्याची टीका अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

बोलताना मंत्री नवाब मलिक

या राज्यात तीनही पक्ष एकजुटीने काम करत आहेत. ही आघाडी केवळ पाच वर्षांसाठी नाही तर पंचवीस वर्षांसाठी असल्याची भूमिका तीनही पक्षांची आहे, असे नवाब म्हणाले.

हेही वाचा - व्हिडिओ : लोकलमध्ये 'स्टंट' करताना तडीपार आरोपी ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details