मुंबई -हे कायद्याचं राज्य आहे, त्यामुळे कोणीही हातात दगड, तलवार घेण्याची भाषा करू नये असे वक्तव्य अल्पसख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले. जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसी विरोधात मोर्चे काढणाऱ्यांना दिला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला प्रतिउत्तर दिले आहे.
राज ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच दगडाला उत्तर दगडाने, तलवारीला उत्तर तलवारीने देऊ असे सडेतोड भाषण त्यांनी केले. यावरवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. देशात कायद्याचे राज्य आहे. कोणी कायदा हातात घेतला तर कायदा कायद्याचे काम करील असे नवाब मलिक म्हणाले. कोणीही हातात दगड तलवार घेण्याची भाषा करू नये, हे कायद्याचे राज्य असल्याचे मलिक म्हणाले.