मुंबई - बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना परत पाठवण्यासाठी मनसेकडून ९ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक पार पडली. या मोर्चाच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंना मोर्चा काढण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या मोर्चाला परवानगी देण्याबाबत राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल असे मत मलिक यांनी व्यक्त केले.
'राज ठाकरेंच्या मोर्चाबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल' - राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देण्याबाबत सरकार योग्य निर्णय घेईल,
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना परत पाठवण्यासाठी मनसेकडून ९ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक पार पडली. या मोर्चाच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक
मनसेकडून येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या तयारीसाठी मनसेची आज रंगसारदामध्ये बैठक झाली. या बैठकीला राज ठाकरेही हजर होते. मात्र, अवघ्या १० मिनिटांत ते बैठकीतून बाहेर पडले. मात्र, यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मलिक म्हणाले, की कोणत्याही पक्षाला त्यांची भुमिका कोणत्याही पक्षाला त्यांची भुमिका ठरवण्याचा अधिकार आहे.