मुंबई - राज्यात कायद्याचे राज्य असून कायदाच दादा आहे. त्यामुळे कुणीही धर्मांतरासारखे प्रकार जबरदस्तीने करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिला आहे. राज्यातील महिला व बालविकास क्षेत्रातील अंगणवाड्या व बाल सुधारगृहांचे बळकटीकरण, पर्यटनाला चालना देणे आणि कौशल्य विकास क्षेत्राला गती देण्यासाठी कॅनडा येथील इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्स सहकार्य करणार असल्याची ग्वाही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
मालेगाव येथे जबरदस्ती धर्मांतरमालेगाव येथे जबरदस्ती धर्मांतर होत असल्याचे एक प्रकरण समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर मंगल प्रभात लोढा म्हणाले की, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे कुणाचेही जबरदस्तीने धर्मांतर होणार नाही. कुणीही कायदा हातात घ्यायचा प्रयत्न करू नये. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे परिस्थिती सांभाळण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे कायदा हाच दादा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सागरी किल्ल्यांवर सुविधा निर्माण करणारमंत्रालयातील दालनात आज मुळ भारतीय वंशाचे कॅनडास्थित नागरिकांचे इंडो कॅनेडियन चेंबर कॉमर्सचे शिष्टमंडळ मिशन भारत उपक्रमांतर्गत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी पर्यटन मंत्री लोढा बोलत होते. यावेळी कॅनडा येथील इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद भारव्दाज, सदस्य राकेश जोशी, चिराग शहा, विरेंद्र राठी, राजेश शर्मा यांची उपस्थिती होती.