मुंबई Minister Mangal Prabhat Lodha :मुंबई शहर आणि उपनगरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दहीहंडी उत्सवादरम्यान थरावर थर लावताना अनेक ठिकाणी थर कोसाळ्याल्या घटना घडल्या होत्या. यात अनेक गोविंदा जखमी झाले होते. जखमी झालेल्या गोविंदांवर महापालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदाची भेट घेतलीय. यावेळी त्यांनी गोविंदाला एक लाख रुपयांची मदतदेखील केली. (Injured Govinda)
उत्तम उपचार द्या : दहीहंडीच्या उत्सवामध्ये थरावर थर लावतांना सुरज कदम नावाचा गोविंदा दुसऱ्या थरावरुन कोसळून गंभीर जखमी झाला होता. त्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. याविषयी माहिती घेतल्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी थेट केईएम रुग्णालय गाठत जखमी गोविंदा सुरज चव्हाणची भेट घेऊन विचारपूस केलीयं. तसेच तब्येतीची काळजी घेण्याबाबत सल्ला देखील दिलायं. यावेळी सुरजवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेत सुरजच्या आरोग्याविषयी महिती जाणून घेत, सुरजला सर्वोपरी उत्तम उपचार दिले जावं असं त्यांनी डॉक्टरांना सांगितलंय. मंत्री मंगलप्रभात लोढा (Tourism Minister Mangal Prabhat Lodha) यांनी सुरजची भेट घेतल्यानंतर वैयक्तिकरित्या एका लाखाची मदत केलीय. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत देखील देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलयं.