मुंबई -शहरातील संक्रमण शिबिरांची संख्या खूप कमी असल्याने जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या दुरुस्तीसाठी किंवा पुनर्विकासासाठी संक्रमण शिबिरे उपलब्ध होत नाहीत. तसेच म्हाडासाठी सरकारकडून देखभाल दुरुस्तीचा निधीही वाढवला जात नाही. या विषयावर आमदार अमिन पटेल ( MLA Amin Patel ) यांनी लक्षवेधीमार्फत सरकारचे लक्ष वेधले.
सखोरीला आपला विभाग जबाबदार असून आपल्याला त्याची लाज वाटते -या लक्षवेधीला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संक्रमण शिबिरांची संख्या कमी असल्याचे मान्य केले आहे. तसेच अस्तित्वात असलेल्या संक्रमण शिबिरांमध्ये असलेले घुसखोर ही खूप मोठी डोकेदुखी आहे, ही घुसखोरी आत्ताच झाली नसली तरी या घुसखोरीला आपला विभाग जबाबदार असून आपल्याला त्याची लाज वाटते, असे वक्तव्य मंत्री आव्हाड यांनी सभागृहात ( Minister Jitendra Awhad on His Department ) केले. कर संकलकांच्या आशीर्वादाशिवाय हे होणे शक्य नाही. त्यामुळे या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करणार आहोत. मुंबईकरांच्या हितासाठी संक्रमण शिबिरांची चौकशी करण्यात येईल जिथे करसंकलन दोषी आढळतील तिथे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.