मुंबई - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. मात्र, बीडमध्ये केलेल्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे स्पष्टीकरण गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. तसेच इंदिरा गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत कधीच तुलना होऊ शकत नाही असे ते म्हणाले.
दरम्यान, आज जे देशात होत आहे, एकेकाळी देशात इंदिरा गांधींनीही असाच लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केला होता', असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यावर आता माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे स्पष्टीकरण आव्हाड यांनी केले आहे. बीड येथील संविधान बचाव महासभेत जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केले होते.