मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्री आणि वर्षा बंगल्यावर काल (दि. 6 सप्टें) धमकीचे फोन गेले होते. आज (दि.7 सप्टें) गृहमंत्री आणि शरद पवार यांना धमकीचे फोन आल्याची बातमी आहे. राज्याचा गृह विभाग याची चौकशी नक्की करेल. चौकशीनंतर दोषींना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
...'त्या' फोनची चौकशी गृहविभाग करेल - मंत्री जयंत पाटील - मंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
मर्यादा कोणी व कशा पाळायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहेत. महाराष्ट्रातील जनतेपर्यंत योग्य तो संदेश पोहोचला असेल, असे म्हणत नाव न घेता जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कंगना रनौतवर निशाणा साधला.
कंगना रानौत या विषयावर मी बोलणार नाही. अलीकडच्या काळात आवश्यक आणि अनावश्यक गोष्टींवर चर्चा सुरू असते. वास्तविक अशा स्वरूपाच्या चर्चांवर प्रतिक्रिया टाळल्या पाहिजेत. मर्यादा कोणी आणि कशा पाळायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेपर्यंत योग्य संदेश गेला असेल, असे मला वाटते, अशा शब्दांत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कंगनाला प्रत्युत्तर दिले.
हेही वाचा -कोरोनामुक्त नागरिकांनी प्लाझ्मादान करावे; राजेश टोपे यांचे आवाहन