मुंबई -राम मंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतो की नाही हे बघण्यासाठी देशातील राम भक्तांनी एक अराजकीय समिती तयार करावी. राम मंदिर उभारणीतील जमाखर्च आणि त्याचा हिशोब त्या समितीने निरीक्षणाखाली ठेवावा, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. प्रामाणिकपणे मंदिराचे पावित्र्य राखून राम मंदिर उभे राहावे, अशी राम भक्तांची अपेक्षा असल्याचेही मंत्री पाटील म्हणाले.
राम मंदिरासाठीच्या निधीत भ्रष्टाचार अत्यंत दुर्दैवी
अतिशय भक्तिभावाने राम मंदिर उभे व्हावे, अशी या देशातील रामभक्तांची इच्छा आहे. म्हणून रामभक्त मोठ्या प्रमाणावर निधी देत आहेत. मात्र, राम मंदिर उभारणीत गोळा होणार्या निधीत भ्रष्टाचार होत असेल तर हे दुर्दैवी आहे, अशी नाराजीही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.