मुंबई -महात्मा गांधींचे नाव घ्यायचे आणि कृती उलटी करायची, रामाचे नाव घ्यायचे कृती नथुरामाची करायची, ही भाजपची पद्धत पुन्हा एकदा पुढे आली आहे, असा जोरदार टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. यावेळी त्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचाही निषेध केला आहे.
'रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपची पद्धत समोर आली'
हाथरस येथील घटनेचा तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की झालेल्या घटनेचा निषेध करत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
जयंत पाटील
भाजपने ज्यापद्धतीने उत्तरप्रदेश आणि देशामध्ये बळाचा वापर करुन बरीच आंदोलने चिरडली. तसेच राहुल गांधी यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रकार आहे. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा निषेध करतानाच भाजपने वेळीच आपली धोरणे व भूमिका सुधारली पाहिजे नाहीतर देशातील परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -पायल घोष प्रकरणात अनुराग कश्यपची पोलिसांकडून आठ तास चौकशी
Last Updated : Oct 1, 2020, 9:27 PM IST