मुंबई - राज्यात झालेले सत्तापरिवर्तन भाजपच्या जिव्हारी लागल्यानेच ते सुडबुद्धीने वागत असल्याचे वक्तव्य जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. भाजपची ही वृत्ती लोकशाहीला घातक असल्याचे पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासाची सुरक्षा हटवण्यात आल्याने जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली.
'राज्यात झालेले सत्तापरिवर्तन भाजपच्या जिव्हारी' - राज्यात झालेले सत्तापरिवर्तन भाजपच्या जिव्हारी
राज्यात झालेले सत्तापरिवर्तन भाजपच्या जिव्हारी लागल्यानेच ते सुडबुद्धीने वागत असल्याचे वक्तव्य जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. भाजपची ही वृत्ती लोकशाहीला घातक असल्याचे पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासाची सुरक्षा हटवण्यात आल्याने जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली.
जलसंपदामंत्री जयंत पाटील
शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था काढल्याने राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड या मुद्यावरुन भाजपर टीका केल्यानंतर आता मंत्री जयंत पाटील यांनीही भाजपला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रात झालेले सत्तापरिवर्तन हे भाजपच्या जिव्हारी लागल्याचे पाटील म्हणाले.