मुंबई -भाजपा नेते किरीट सोमैया यांनी माझ्या आजारपणात विचारपूस केली याबाबत मी त्यांचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. तर किरीट सोमैया जे आरोप करत आहेत यात भाजपचा मोठा षडयंत्र आहे, असा दावाही त्यांनी केला. ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पत्रकार परिषदेत बोलताना हसन मुश्रीफ काय म्हणाले मंत्री हसन मुश्रीफ?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत. मी सातत्याने केंद्रीय तपास संस्थांच्या गैरवापराबाबत बोलत होतो. त्यामुळे ते माझ्या मागे लागले आहेत. चंद्रकांत पाटील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा पक्ष तिथे भुईसपाट झाला आहे. कोल्हापुरमध्ये भाजपाला भुईसपाट केले म्हणून मला टार्गेट केले जात आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी मला भाजपामध्ये प्रवेशाची ऑफर दिली होती, असा दावाही यावेळी त्यांनी केला.
महाविकास आघाडी मजबूत झाली म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. किरीट सोमैया बोलतात फडणवीस यांना कागदपत्रे देतो म्हणजे ते सांगतात ते करतात का? असा सवालही त्यांनी केला. किरीट सोमैया यांनी आज केलेला आरोप खोटा आहे. 2012 आणि 2013 या कंपनीने हा कारखाना घेतला होता. हा शासनाकडून सहयोगी तत्त्वावर घेतला होता. दोन वर्षांपूर्वी हा कारखाना सोडला. आप्पासाहेब नलावडे कारखानाबाबत माझ्या जावईचा काही संबध नाही.
चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाने वागावे. सोमैया यांचा आरोप हा अत्यंत खोटा आहे. त्यांची सीए पदवी खरी आहे का? तसेच तुम्हाला घोटाळेबाज म्हणायचा अधिकार काय आहे? असे सवालही त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा -देवेंद्र फडणवीस दबंग नेता, 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात - चंद्रकांत पाटील
तुम्ही तक्रार नोंदवली आहे त्या संस्था चौकशी करतील. भाजपच्या काळात चिक्की घोटाळा, गृहनिर्माण घोटाळा बाहेर का आला नाही. सोमैया यांनी भाजपच्या कारखानादारांचे घोटाळे बाहेर काढावे, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केले. तर याविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. फक्त सुपारी घेऊन काम करू नये. मुद्दामून जुनी प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. मी कॅबिनेटमध्ये बोललो होतो. आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना म्हटले आहे, आरोप करून पर्यटनला जाऊ नका. तर किरीट सोमैया यांना कोल्हापूरमध्ये जाऊ दिले नाही, हा प्रशासनाचा निर्णय असल्याचे ते म्हणाले.