महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्त्वावरील १२४ पदे तातडीने भरणार - मुंबई बातमी

अनुकंपा तत्त्वावरील पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला असून गट–क व गट–ड मधील विविध संवर्गातील १२४ पदांची भरती करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार

By

Published : Oct 1, 2020, 12:41 AM IST

मुंबई - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्त्वावरील पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला असून गट–क व गट–ड मधील विविध संवर्गातील १२४ पदांची भरती करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. २२ मार्च २०१२ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लिपिक–टंकलेखक पदभरतीवरील निर्बंध शिथिल करून गट–क मधील लिपिक-टंकलेखक यांच्या एकूण रिक्त पदांच्या 10 टक्के पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली.

२३ ऑगस्ट २०१६ रोजी झालेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार २२ मार्च २०१२ च्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये नमूद केल्यानुसार लिपिक टंकलेखकांची ११ पदे, ५ टक्केच्या मर्यादेत भरण्यात आली. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ४ ऑक्टोबर २०१८ अन्वये मान्यता दिल्यानुसार वर्ग – ३ व वर्ग – ४ ची एकूण १५ पदे, १० टक्केच्या मर्यादेत भरण्यात आली आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या ११ ऑक्टोबर २०१९ अन्वये सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय १० जून २०१९ च्या शासन निर्णयानुसार वर्ग- ३ व वर्ग-४ ची एकूण १५ पदे भरण्यात आली.

३१ डिसेंबर २०१९ रोजी सरळ सेवेची असणारी रिक्त पदे विचारात घेऊन सामान्य प्रशासन विभागाच्या ११ सप्टेंबर २०१९ मधील शासन निर्णयानुसार येणारी २० टक्के पदे विचारात घेऊन प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यास मान्यता देण्यात आली आहे. भरती सन २०१९ या वर्षाकरिता असून शासन निर्णय १५ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार १० टक्के अनुकंपा धारकांची सन २०१९ मधील भरती यापूर्वीच मंजूर झालेली असल्याने १५ पदे वगळून आता १२४ अनुकंपाधारकांची संवर्गनिहाय पदभरती करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details