महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 2, 2020, 7:19 PM IST

Updated : Dec 2, 2020, 7:24 PM IST

ETV Bharat / state

'उत्तर प्रदेशातील दरोडेखोरांची यादी पाहिली तर कोणीच तेथे चित्रिकरणासाठी जाणार नाही'

उत्तर प्रदेश हा सर्वात असुरक्षित राज्य आहे. दिवसाढवळ्या बँकांमध्ये दरोडे टाकले जातात. त्या राज्यात कुठलीही सुरक्षितता नाही, अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

मंत्री गुलाबराव पाटील
मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई - उत्तर प्रदेशातील बँकांमध्ये रोज होणारे दरोडे आणि लूटमार कोण करत आहेत, त्या दरोडेखोरांच्या नावांची यादी जरी बॉलीवूडच्या लोकांनी पाहिली तर उत्तर प्रदेशात कोणीही चित्रिकरणासाठी जाणार नाही. गेले तर तेथे जाऊन त्यांना काय डाकू बनायचे आहे का, असा सवाल पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी (दि. 2 डिसेंबर) केला.

बोलताना मंत्री गुलाबराव पाटील

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील बॉलीवूड उत्तर प्रदेशला घेऊन जाण्यास संदर्भात केलेल्या विधानावर गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, उत्तर प्रदेश हा सर्वात असुरक्षित राज्य आहे. दिवसाढवळ्या बँकांमध्ये दरोडे टाकले जातात. त्या राज्यात कुठलीही सुरक्षितता नाही. त्यामुळे मुंबई ही सुरक्षीत आहे. त्यामुळे कोणीही उत्तरप्रदेशात मुंबईतील उद्योग-धंदे नेऊ शकत नाही. त्यामुळे योगी यांच्याकडून जो प्रकार सुरू आहे त्याचे फलित काय आहे? असा सवालही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.

मुंबईला कुणीही तोडू शकत नाही. मुंबईची नाळ अनेक क्षेत्राशी खुप घट्ट जुळलेली आहे. म्हणूनच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि ती ओळख यापुढेही कायम राहणार आहे. मुंबईची ओळख पुसण्याचे काम कोणी करत असेल तर ते अपयशी ठरतील आणि मुंबईकर ते खपवून घेणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

Last Updated : Dec 2, 2020, 7:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details