महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chandrakant Patil Hearing : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा, उद्या सत्र न्यायालयात सुनावणी - Session Court Hearing Tomorrow

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समाज सुधारक महात्मा फुले यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी, भाजपाचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांच्या विरोधातील प्रकरणावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी (Atrocities Act has been registered) अपेक्षित होती. मात्र काही कारणास्तव ही सुनावणी आज झाली नसून; उद्या (Session Court Hearing Tomorrow) होणार आहे.

Session Court Hearing Tomorrow
उद्या सत्र न्यायालयात होणार सुनावणी

By

Published : Dec 27, 2022, 7:08 PM IST

मुंबई : भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी अँड. नितीन सातपुते यंच्यामार्फत मुंबई सत्र न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत चंद्रकांत दादा पाटील (Minister Chandrakant Patil) आणि इतर विरोधात ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा (Atrocities Act has been registered) दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात (Session Court Hearing Tomorrow) आली आहे .


चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर पुण्यातील एका खाजगी कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. म्हणून ॲट्रॉसिटी कायद्या नुसार त्यांच्यासह इतर सह आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत याचिका दाखल करण्यात आली आहे .



याचिकाकर्ता अशोक कांबळे यांचे वकील ॲड नितीन सातपुते यांनी हे प्रकरण विशेष ॲट्रॉसिटी कोर्टाकडे देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यावर मुंबई सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती यांनी ही मागणी फेटाळत विशेष पीएमएलए कोर्टातच राजकीय व्यक्तींच्या साठी विशेष कोर्ट या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. म्हणून या प्रकरणावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या कोर्टा समोर सुनावणी होणार आहे.



राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महापुरुषांविरोधात केलेल्या वक्तव्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत याचिका दाखल करण्यात आली होती. घाटकोपर येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा, याकरिता भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते गेले असता गुन्हा दाखल करून घेतला नसल्याने, या विरोधात संबंधित गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना मेलद्वारे सांगून सुद्धा कुठलेही कारवाई करण्यात आली नसल्याने, त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.



भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनुसार राज्याचे तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह इतर म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार राम कदम, मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच घाटकोपर मधील पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी यांच्या विरोधात देखील एट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details