मुंबई -महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली. ( Minister Balasaheb Thorat Tested Positive for Covid 19 )
ट्विटमध्ये काय म्हणाले मंत्री बाळासाहेब थोरात? ट्विटमध्ये काय म्हणाले मंत्री बाळासाहेब थोरात?
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी, असे मंत्री बाळासाहेब थोरात आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
हेही वाचा -Omicron Death In Maharashtra : भारतात ओमायक्रॉनचा पहिला बळी; पिंपरी-चिंचवडमध्ये हृदयविकाराने मृत्यू झालेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह
ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना कोरोनाची लागण -
राज्यातील ठाकरे सरकारमधील मंत्री असलेले बाळासाहेब थोरात यांचा कोरोना अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला. याआधी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ( Minister Varsha Gaikwad Tested Positive ) तर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure Corona Positive) यांचाही कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.