महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'खाटेचे कुरकुरणे ऐकून घ्या, नंतर अग्रलेख लिहा', बाळासाहेब थोरातांचे प्रत्युत्तर

हा अग्रलेख अत्यंत अपूर्ण माहितीवर देण्यात आला असून त्यामुळे आमच्याबद्दल चुकीचा संदेश जात आहे. पहिले खाटेचे कुरकुरणे ऐकून घ्या, नंतर पुन्हा अग्रलेख लिहा, असे म्हणत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.

minister balasaheb thorat
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By

Published : Jun 16, 2020, 2:38 PM IST

मुंबई - विधान परिषदेचे जागावाटप तसेच मुख्य सचिवांच्या निर्णय प्रक्रियेवर नाराज असलेल्या काँग्रेसला 'सामना'ने आज अग्रलेखातून डिवचल्याने काँग्रेस नेते संतापले आहेत. हा अग्रलेख अत्यंत अपूर्ण माहितीवर देण्यात आला असून त्यामुळे आमच्याबद्दल चुकीचा संदेश जात आहेस, असे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीम्हटले आहे. पहिले खाटेच कुरकुरणे ऐकून घ्या नंतर पुन्हा अग्रलेख लिहा, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.

बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात 'खाट का कुरकुरतेय ? या मथळ्याखाली अग्रलेख लिहून महाविकास आघाडीतील मंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यावर टीका करण्यात आली आहे. त्यावर थोरात म्हणाले की, अत्यंत अपूर्ण माहिती असलेला अग्रलेख आहे. आमचे विषय हे राज्यातील जनतेच्या हिताचे आहेत. आम्ही कुठल्याही बदल्यांसाठी आग्रही नाही. त्यामुळे खरे-खोटे नेमके मुख्यमंत्र्यांना ऐकून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांचे समाधान होईल, असेही थोरात म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचीे आमची कालच (दि. 15 जून) भेट होणार होती, पण, काही कारणांमुळे ती टळली; परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज भेटतील. म्हणूनच आम्ही आमचे म्हणणे पुन्हा मांडू आणि ते मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा समाधान होईल. या भेटीनंतर 'सामना'ने पुन्हा त्यासाठी अग्रलेख लिहावा, अशी मागणीही थोरात यांनी केली.

'सामना'च्या अपूर्ण माहितीमुळे आमच्या संदर्भात चुकीचा संदेश जात आहे. आम्ही आघाडीसोबत भक्कम आहोत. त्यामुळे हा अग्रलेख चुकीच्या माहितीवर असल्याचे थोरात म्हणाले. अनेकदा आम्ही एकत्र असताना काही विषयांवर चर्चा होत नाही. परंतु राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी आमचे काही म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, असे थोरात म्हणाले.

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण नियोजन करत आहेत. मात्र, ही भेट दोन वेळा पुढे गेल्याने काँग्रेस आणि शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे मानले आहे. त्यातच आज ठरलेल्या भेटीसाठी अद्याप मुख्यमंत्र्यांकडून वेळ न मिळाल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा -'डिस्चार्ज' कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्याने जयंत पाटील म्हणाले, 'वेल डन महाराष्ट्र'

ABOUT THE AUTHOR

...view details