मुंबई - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देशाच्या घसरत्या अर्थव्यवस्थेच्या मुद्यावरुन भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाल्याचे थोरात म्हणाले. तसेच बेरोजगारी गेल्या ४५ वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली असल्याचे थोरात म्हणाले.
'मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेचे वाटोळे' - मोदी सरकारवर बाळासाहेब थोरातांचा निशाणा
राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका अर्थव्यवस्थेला बसल्याचे थोरात म्हणाले.
!['मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेचे वाटोळे' Minister Balasaheb Thorat comment BJP](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5912546-thumbnail-3x2-kakaka.jpg)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी विभाजनवादी सीएए आणि एनआरसी हे कायदे जनतेवर लादण्याचा प्रयत्न करत असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. देशात बेरोजगारी गेल्या ४५ वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. तरूणांना गोली मारो असे सांगून हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करणा-या अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी या आकडेवारीकडे पहावे, असेही थोरात म्हणाले.