मुंबई- शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज (दि. 6 मे) देशात सर्वात जास्त रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी येथील 'कमला लाईफसायन्सेस लिमिलेड'या कंपनीला भेट देत कंपनीचे चेअरमन डाॅ. दिगंबर झवर व उत्पादन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
कंपनीच्या वाढलेल्या क्षमतेनुसार महिन्याला 30 लाखपेक्षा जास्त रेमडेसिवीरचे उत्पादन करण्याची कंपनीची क्षमता आहे. कच्च्या मालाचा पुरवठा मुबलक प्रमाणात झाल्यास 50 लाखांपेक्षा जास्त रेमडेसिवीरचे उत्पादन कंपनी घेऊ शकते. देशात रेमडेसिवीरचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांना कच्चा माल माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते.