मुंबई - खातेवाटपासंदर्भातील महाविकासआघाडीची बैठक पार पडली असून याबद्दलचे सर्व मुद्दे सोडवण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच आम्ही आमचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. उद्या शुक्रवारी मुख्यमंत्र्यांमार्फत यावर निर्णय घेण्यात येईल, असेही चव्हाण म्हणाले.
'खातेवाटपासंदर्भात सर्व मुद्दे सोडवण्यात आलेत' - mahavikas aaghadi latest news mumbai
खातेवाटपासंदर्भात जे काही मुद्दे होते ते सोडवण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
अशोक चव्हाण
गेल्या महिन्यात 30 डिसेंबरला मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. मात्र, अजूनही खातेवाटपाचा तिढा सुटला नाही. यासाठी पुन्हा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तर आता मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शुक्रवारी खातेवाटप होईल यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
हेही वाचा -'खातेवाटपाचा निर्णय आठ दिवसापुर्वीच झालाय, आज किंवा उद्या मंत्र्यांना खातेवाटप होईल'