मुंबई - तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा आरक्षणाचा सुधारित कायदा करण्यास केंद्राला वाव आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षण देण्याचा केलेला कायदा सर्वोच्च न्यायलयात टिकला पाहिजे. यासाठी केंद्र शासनाने राज्य सरकारच्या बाजूने भूमिका मांडावी. समाजाच्या नावाने राजकारण न करता, सर्वांनी आरक्षणाचा मुद्दा तडीस नेण्यास एकत्रित यावे, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत दिले.
केंद्र सरकार सहकार्य करत नाही
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कॉंग्रेसचे परिषदेचे सदस्य शरद रणपिसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला. केंद्राशी निघडीत असलेले घटना दुरुस्ती, लाईन्स शेड्यूल्डच्या विषयांवर केंद्रीय कायदेमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारची भूमिका मांडताना, मराठा आरक्षणासंदर्भात 8 मार्चपासून नियमित सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी केंद्र शासनाने राज्य सरकारने तयार केलेले 3 ते 4 मुद्द्यांवर चर्चा करायला हवी. परंतु, केंद्रीय कायदेमंत्री बैठकीला हजर राहत नसल्याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.
संवैधानिक पेच सोडविण्यासाठी प्रत्यक्षसुनावणी घ्या
मराठा आरक्षणावर अंतरिम प्रतिबंध लागू करताना, सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा साहनी प्रकरणाचा संदर्भ देत महाराष्ट्रातील आरक्षण 50 टक्क्यांवर गेल्याचे नमूद केले होते. हरियाणा, छत्तीसगड आदी बहुतांश राज्यातील आरक्षणाचे प्रमाण सध्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे 30 वर्षापूर्वीच्या इंद्रा साहनी निवाड्याचे पुनर्विलोकन आवश्यक आहे. तो निकाल नऊ न्यायमूर्तींनी दिला असल्यामुळे त्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी नऊ किंवा त्याहून अधिक सदस्यांचे घटनापीठ स्थापन करावे लागणार आहे. मात्र, राज्य सरकारांच्या अधिकारांवरील परिणाम आदी संवैधानिक व न्यायालयीन बाबींवर निर्णय घेण्यास केंद्र शासनाला सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक बाजू मांडण्यास वाव आहे. मात्र ईडब्ल्यूएस, एसईबीसी आरक्षणाच्या खटल्यातील संवैधानिक पेच केंद्र सरकारने सोडवण्यासाठी प्रत्यक्ष सुनावणी यासाठी घ्यावी, अशी सूचना चव्हाण यांनी केली.
आरक्षणासाठी एकजूट दाखवा