मुंबई - नाराज मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करून त्यांची बाजू पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार असल्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विजय वडेट्टीवार नाराज असल्याचे मान्य केले आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य सुरूच आहे. ओबीसी, खार जमीन विकास आणि भूकंप पुनर्वसन खाते दिल्याने काँग्रेसचे विजय वडेट्टीवार नाराज झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची वडेट्टीवार यांच्यावर प्रतिक्रिया हेही वाचा - वंचित समाजाला न्याय देण्यासाठीच आरक्षण - मुख्यमंत्री
विजय वडेट्टीवारांचे निकटवर्तीय ते राजीनामा देणार असल्याचे सांगत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही त्यांनी दांडी मारली होती. त्याशिवाय आज (बुधवारी) झालेल्या विशेष अधिवेशनात ते अनुपस्थित होते. असंतुष्ट विजय वडेट्टीवार अशोक चव्हाण यांनी शाब्दिक भर दिल्याने महाआघाडी धुसफूस आणखी स्पष्ट झाल्याचे चिन्ह आहेत.
हेही वाचा - विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचे पंडित नेहरू यांच्या विरोधात वादग्रस्त विधान.. परिषदेत गदारोळ