मुंबई - येत्या 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्ष पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याला सिंगल यूज प्लास्टिक (Single Plastic Use) पासून मुक्त करण्याचे लक्ष पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठेवले आहे. महाराष्ट्र प्लास्टिक मुक्त होण्यासाठी आदित्य ठाकरेंनी अधिकाऱ्यांनाही निर्देश दिले असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी विधानपरिषदेत दिली.
हीरकमहोत्सव दिनी 'प्लास्टिक मुक्त' होणार महाराष्ट्र - प्लास्टिक मुक्त न्यूज
1 मे ला महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्ष पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याला सिंगल यूज प्लास्टिक (Single Plastic Use) पासून मुक्त करण्याचे लक्ष पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठेवले आहे.
![हीरकमहोत्सव दिनी 'प्लास्टिक मुक्त' होणार महाराष्ट्र Minister Aadity thackeray comment on Plastic free](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6242266-thumbnail-3x2-kakaka.jpg)
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
ही चळवळ बनवली पाहिजे
विधानपरिषदेते बोलताना आदित्य ठाकरेंनी सभागृहातील सर्व सदस्यांना विनंती केली की, प्लास्टिक मुक्तीसाठी आपण चळवळ बनवली पाहिजे. हे जर आपण केले तर आपण फक्त राज्यातच नाहीतर देशात बदल घडवू शकतो असे आदिच्य ठाकरे म्हणाले.