मुंबई- मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असून कधीकाळी मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी आणि दादरमध्ये आता कोरोनाग्रस्तांची संख्या घटत चालली आहे. यात सर्वात दिलासादायक बाब म्हणजे शुक्रवारी (दि. 25 डिसें.) धारावीत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नव्हता. तर शनिवारी (दि. 26 डिसें.) दादरमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा शून्य होता. पण, आज (दि. 27 डिसें.) दादरमध्ये 7 तर धारावीत 3 रुग्ण आढळले आहेत. एक आकडी रुग्ण संख्या असल्याने ही दिलासादायक बाब मानली जात आहे.
जी उत्तर दाट लोकवस्तीचा परिसर असल्याने वाढली होती भीती
जी उत्तर विभाग हा मोठा विभाग आहे. तर यात आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी, अशी ओळख असलेली धारावी आणि दादर-माहीमसारखा गजबजलेला, बाजारपेठांचा परिसर आहे. त्यामुळे या विभागात कोरोनाचे रुग्ण एप्रिल-मे महिन्यामध्ये मोठ्या संख्येने वाढू लागले. त्यामुळे मुंबई महापालिकेची धास्ती चांगलीच वाढली. त्यात काही दिवसांनी या परिसराला मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखू जाऊ लागले. दाट लोकवस्तीच्या आणि गजबजलेल्या परिसरात कोरोना वाढला तर अडचणी वाढण्याची भीती होती. त्यामुळे पालिकेने येथे आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली.
अखेर प्रयत्न यशस्वी