मुंबई- शहरात पाणी कपात सुरू असतानाच घाटकोपर पूर्व येथे पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे पाईपलाईन फुटलेक्या ठिकाणी पालिकेने खड्डा खोदल्याने त्यात कोणीतरी पडून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घाटकोपर परिसरात पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाण्याची नासाडी - Mumbai latest news
मुंबईत 7 डिसेंबर पासून 10 टक्के पाणी कपात सुरू आहे. पाणी कपात सुरू असतानाच मंगळवारी घाटकोपर पूर्व पंतनगर समता कॉलनीमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.
![घाटकोपर परिसरात पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाण्याची नासाडी water waste in Ghatkopar area](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5334122-thumbnail-3x2-mum.jpg)
हेही वाचा - राजावाडी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग रात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी
मुंबईत 7 डिसेंबर पासून 10 टक्के पाणी कपात सुरू आहे. पाणी कपात सुरू असतानाच मंगळवारी घाटकोपर पूर्व पंतनगर समता कॉलनीमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्याची पाईप फुटली त्याठिकाणी पालिकेने खड्डा खोदला आहे. खड्डा खोदलेल्या ठिकाणी एका बाजूने बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. मात्र, पाईपलाईन फुटलेला रस्ता रहदारीसाठी मोठ्या प्रमाणात वापराला जातो. त्यामुळे खड्ड्यात पडून एखाद्याचा अपघात होवू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.