मुंबई:राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. राज्यपाल रमेश बैस यांनी पहिल्या दिवशी अभिभाषण केले. त्यापूर्वी आमदारांसाठी आरक्षित असलेल्या खुर्च्यांवर ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर बसल्याचे आमदार आदित्य ठाकरे यांना दिसून आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना, याबाबत जाब विचारतात नार्वेकरांना काढता पाय घ्यावा लागला. आदित्य ठाकरे यांनी थेट मिलिंद नार्वेकर यांनाच लक्ष केल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमध्ये चांगली चर्चा रंगली होती.
मिलिंद नार्वेकर: शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. नार्वेकरांशिवाय मातोश्री असो किंवा शिवसेना भवन वरून पान हलत नाही असे बोलेल जात होते. शिवसेनेतून आजवर बाहेर पडलेल्या अनेक नेत्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला होता. उद्धव ठाकरेंनी नार्वेकर यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना सातत्याने पाठीशी घातले. सेनेतून बाहेर पडलेल्या आणि यावरून उद्धव ठाकरे यांना सातत्याने खडे बोल सुनावले होते.
नार्वेकर टार्गेटवर: शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना घेऊन बंडखोरी केल्यानंतर सरकार अल्पमतात आले. एकदम विश्वासू असलल्याने ठाकरेंनी नार्वेकर यांना एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी सुरतमध्ये पाठवले. शिंदे यांनी ठाकरे यांचे आदेश फेटाळून लावले होते. राज्यात यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांनी देखील नार्वेकरांकडे अंगुलीनिर्देश केले होते.