मुंबई -शिवसेना सचिव व मुख्यमंत्र्यांचे सध्या विशेष कार्यकारी अधिकारी असलेल्या मिलिंद नार्वेकर यांची मुंबई प्रीमियर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या चेअरमनपदी निवड झाली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर शिवसेनेच्या नेत्याने क्रिकेटच्या कार्यक्षेत्रात थेट प्रवेश केला आहे.
गव्हर्निंग कौन्सिलच्या चेअरमन पदी निवड -
मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) ची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. शरद पवार यांच्यासह अनेक मोठी मंडळी या सभेला उपस्थितीत होते. या बैठकीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची मुंबई प्रीमियर लीगच्या (एमपीएल) गव्हर्निंग कौन्सिलच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली. माजी मुख्यमंत्री-शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्याच्या कार्यक्षेत्रात थेट प्रवेश केला आहे.
कोण आहेत नार्वेकर -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव म्हणून मिलिंद नार्वेकर यांची ओळख आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर मिलिंद नार्वेकर यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांना भेटायचे असेल तर नार्वेकरांना भेटल्याशिवाय पर्याय नाही, असे समीकरण झाले होते.
हेही वाचा- कार्यकर्तेच कोरोनाच्या नियमांचे पालन करत नाही, रोहित पवारांनी दिला घरचा आहेर