मुंबई: शिवसेनेला मुंबई मनपातून हद्दापार करा, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि अमित शहा यांच्यामध्ये दरी निर्माण झाली होती. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर मातोश्रीपासून काही दिवस लांब होते. आता नार्वेकर (Milind Narvekar) यांनी गृहमंत्री अमित शाहांना (Amit Shah) वाढदिवसानिमित्त 'सर्व शक्तिमान देव तुम्हाला निरोगी आरोग्य लाभो', अशा शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या शुभेच्छांमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
Milind Narvekar: नार्वेकरांनी दिल्या अमित शाहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण - उद्धव ठाकरे
मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी गृहमंत्री अमित शाहांना (Amit Shah) वाढदिवसानिमित्त 'सर्व शक्तिमान देव तुम्हाला निरोगी आरोग्य लाभो', अशा शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या शुभेच्छांमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
एकनाथ शिंदेंची सुद्धा घेतली होती भेट: मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जातात. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने नार्वेकरांनी गट बदलला का, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र दोघांनीही त्या चर्चा धुडकावून लावल्या. मात्र, शिंदे गणेशोत्सवात नार्वेकर यांच्या घरी गेल्याने चर्चेला पुन्हा दुजोरा मिळाला होता. दसरा मेळाव्यात मात्र नार्वेकर ठाकरेंसोबतच होते. परंतु, उद्धव ठाकरेंनी यानंतर बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू असलेले रवी म्हात्रे यांच्याकडे सर्व कारभार देत, नार्वेकरांना दूर केले. शिवाय मुंबई क्रिकेट क्लबच्या निवडणुकीवर देखील बहिष्कार टाकला होता. त्यानंतर नार्वेकर आणि ठाकरेंमध्ये दुरावा निर्माण झाला.