मुंबई - मुंबईत काल (गुरुवारी) सीएसएमटी येथे सायंकाळी साडेसातच्या सुमारास हिमालया जवळ पादचारी ओव्हर ब्रिज कोसळला. या दुर्घटनेत ३ महिलांसह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर राजकारण सुरू करण्यात येत असून, एमआयएमचे आमदार वारीस पठाण आणि काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी या दुर्घटनेला सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
या घटनेला सरकार जबाबदार; काँग्रेस आणि एमआयएमच्या नेत्यांचा आरोप - mim
मुंबईत असे अनेक पूल आहेत जे कधीही कोसळू शकतात. सरकारने याकडे लक्ष द्यावे, कारण लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनाही पत्र देण्यात आले होते. बीएमसी आणि रेल्वे यांनी एकमेकांवर जबाबदारी झटकत आहेत.
![या घटनेला सरकार जबाबदार; काँग्रेस आणि एमआयएमच्या नेत्यांचा आरोप](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2695322-980-b132749a-eec5-4730-b62b-e0b9cd888c2b.jpg)
यावेळी एआयएमआयएमचे आमदार वारीस पठाण म्हणाले, या घटनेला थांबवता आले असते, मुंबईत असे अनेक पूल आहेत जे कधीही कोसळू शकतात. सरकारने याकडे लक्ष द्यावे, कारण लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनाही पत्र देण्यात आले होते. बीएमसी आणि रेल्वे यांनी एकमेकांवर जबाबदारी झटकत आहेत. कारण बीएमसी आणि रेल्वे हे दोन्ही भाजपकडे आहेत. सरकार लोकांची सुरक्षा देण्यात कमी पडत आहे. सरकार मोनो रेल्वे, बुलेट ट्रेन, पुतळाच्या उद्घाटनामागे लागले आहेत. त्यामुळेच ही घटना घडली आहे.
याबाबत मिलिंद देवरा म्हणाले, हे पुल बीएमसी असो किंवा आणि रेल्वे प्रशासनाचे हे दोन्ही सरकारी संस्थाची जबाबदारी आहे. जर सरकारला नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत संदेश द्यायचा असेल तर सरकारने त्वरित या घटनेबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. त्यांच्याविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
तसेच ६ महिन्यापूर्वी ऑडिड रिपोर्ट मागवले होते. त्यामध्ये केवळ मायना दुरूस्ती असल्याचे सांगितले होते. कोण आहे त्या ऑडिटरला बोलावले आहे. त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देवरा यांनी केली.