मुंबई - राफेल प्रकरणात भ्रष्टाचार झाला नसल्यास पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर सत्य मांडावे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे. उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उर्मिला मातोंडकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे आज मिलिंद देवरा यांच्या हस्ते उद्धाटन झाले.
मोदींनी पत्रकार परिषद घेऊन राफेलचे सत्य जनतेसमोर मांडावे- मिलिंद देवरा - मिलिंद देवरा
उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उर्मिला मातोंडकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे आज मिलिंद देवरा यांच्या हस्ते उद्धाटन झाले. त्यावेळी देवरा बोलत होते.

मिलिंद देवरा
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा
कार्यालयाचे उद्घाटन होण्यापूर्वी उर्मिला मातोंडकर या प्रचार रथातून अभिवादन करत कार्यालयात पोहचल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर व मिलिंद देवरा त्यांच्यासोबत होते. उद्घाटन झाल्यावर उर्मिलाने यांनी स्वतः कार्यकर्त्यांना पेढे वाटप केले.