महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुर्ल्यात वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी परप्रांतीय मजुरांची धडपड - मुंबई

परप्रांतियांचे लोंढेच्या लोंढे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात रोजंदारी व तत्सम कामासाठी येत असतात. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात टाळेबंदी झाल्याने अनेकांचे कामे ठप्प आहेत. तसेच मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज वाढत चालल्याने परप्रांतीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गर्दी
गर्दी

By

Published : May 5, 2020, 4:36 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात टाळेबंदी सुरू आहे. मुंबईतील परप्रांतीय मजूर आपल्या राज्यात जाण्यासाठी धडपड करत असताना केंद्राने त्यांना राज्यात परतण्यासाठी श्रमिक विशेष रेल्वे सोडल्या आहेत. या रेल्वेने जाण्यासाठी विविध परवानग्या काढाव्या लागतात. आरोग्य प्रमाणपत्रासाठी मजुरांनी रुग्णालयासमोर रांगा लावल्या आहे.

रुग्णालयासमोर झालेली गर्दी

परप्रांतियांचे लोंढेच्या लोंढे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात रोजंदारी व तत्सम कामासाठी येत असतात. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात टाळेबंदी झाल्याने अनेकांचे कामे ठप्प आहेत. तसेच मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज वाढत चालल्याने परप्रांतीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

टाळेबंदीत वाढ झाल्यानंतर केंद्राने श्रमिक विशेष रेल्वे सुरू केली. त्यामुळे जे परप्रांतीय महाराष्ट्रात अडकले आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात जाता येणार आहे. यासाठी विविध परवानग्या काढाव्या लागतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाची परवानगी आरोग्याविषयीची आहे. डॉक्टरांकडून आरोग्य प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात जे जमा करावे लागते. ते प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या मजुरांनी एक रुपया क्लिनिकबाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

आस सकाळपासून कुर्ला पूर्व रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या वनरुपी क्लिनिकसमोर आज अनेक परराज्यातील कामगारांनी रांग लावल्याचे पाहायला मिळाले. सुमारे 500 ते 700 मीटरपर्यंत ही रांग असून या ठिकाणी या कामगारांची मोफत शारीरिक तपासणी करून प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

हेही वाचा -सामाजिक चळवळीतील झुंजार कार्यकर्ता हरपला, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली कुंजीर यांना श्रध्दांजली

ABOUT THE AUTHOR

...view details