मुंबई - कोरोनाचा देशातील वाढता संसर्ग पाहून केंद्र सरकारने चौथ्यांदा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेल्या मजुरांनी आपापल्या गावी जाण्यासाठी वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात मोठी गर्दी केली. पोलिसांकडून गर्दी करू नका, असे वारंवार आवाहन केले होते. मात्र काही केल्या गर्दी हटत नसल्याचे पाहून पोलिसांना नाईलाजास्तवर लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, याठिकाणी जमलेले जास्तीत जास्त लोक कामानिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मुंबईत आलेले आहेत.
'वांद्रे टर्मिनस येथून ट्रेन सुरू होणार' या अफवेने हजारो परप्रांतीय लोक या स्थानकात जमले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशातलॉकडाऊन आहे. परंतु परराज्यात अडकलेल्या कामगारांना त्यांच्या राज्यात सोडण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी केंद्र शासनाने श्रमिक रेल्वे सुरू केल्या. राज्यातील कामगारांनी परराज्यातील कामगारांनी आपली नोंदणी करून त्यांच्या गावी जावे, असे आव्हान सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास परप्रांतीय कामगारांनी वांद्रे स्थानक परिसरात गर्दी केली.
पश्चिम मार्गावर राहणारे परप्रांतीय मजूर काही नोंदणी केलेले, व काही विनानोंदणी करता गाडी पकडण्यासाठी वांद्रे स्थानकात हजारोच्या संख्येने जमले होते. ज्यांची नोंदणी झाली आहे. त्यांच्यासाठी आज वांद्रे टर्मिनल येथून गोरखपूर आणि बोकोराला गाड्या सुटणार होत्या. त्यामुळे गर्दी होणे साहजिकच आहे. पण आपल्याला गावी जायला मिळेल, या आशेनेविनानोंदणी केलेले परप्रांतीयही त्या ठिकाणी आले होते. वांद्रे टर्मिनस येथून 1200 प्रवाशांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
अफवांमुळे झाली गर्दी -