महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रोजगाराच्या शोधात स्थलांतरित मजूर खेड्याकडून परत मुंबईकडे...

औद्योगिक कारखाने, विविध मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू करण्यासह रोजगाराच्या शोधात परप्रांतीय कामगार मुंबईत परतू लागले आहेत. रेल्वेकडून मिळालेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर कोरानाच्या भीतीने गावात पोहोचलेले साडेपाच लाख कामगार व व्यापारी मुंबईत परतले आहेत.

स्थानांतरित मजूर खेड्याकडून परत मुंबईकडे
स्थानांतरित मजूर खेड्याकडून परत मुंबईकडे

By

Published : Jun 30, 2020, 7:04 PM IST

मुंबई - काही दिवसांपूर्वी मुंबईहून खेड्यात जाण्यासाठी मजूर स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू होती. यावर हीन राजकारणही झाल होत. तर, आता खेड्यात गेलेले मजूर परत येऊ लागले आहेत. महाराष्ट्रात परत हळूहळू रोजगाराच्या संधी मिळत आहेत. औद्योगिक कारखाने, विविध मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू करण्यासह रोजगाराच्या शोधात परप्रांतीय कामगार मुंबईत परतू लागले आहेत. रेल्वेकडून मिळालेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर कोरानाच्या भीतीने गावात पोहोचलेले साडेपाच लाख कामगार व व्यापारी मुंबईत परतले आहेत.

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जूनच्या पहिल्या आठवड्यात एकूण 18 लाख कामगार महाराष्ट्रातून 844 गाड्यांमध्ये स्थलांतरित झाले होते. मुंबईहून बंद दरम्यान जवळपास 1 दशलक्ष लोक आपल्या गावी परतले. यापैकी 7 लाख लोकांनी रेल्वेने प्रवास केला आणि सुमारे 2 लाख लोकांनी इतर मार्गांनी प्रवास केला. मुंबईकडे येणाऱ्या 11 गाड्यांच्या आकडेवारीनुसार या महिन्यात 26 जूनपर्यंत प्रवाशांची संख्या 100 टक्के आहे. एवढेच नाही तर लोक वेटिंग तिकिटेही खरेदी करत आहेत.

याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भास्कर म्हणाले, की 1 जूनपासून आतापर्यंत दोन लाखाहून अधिक प्रवाशांना मुंबईत आणण्यात आले आहे. ते म्हणाले, जेव्हा जेव्हा विशेष गाड्या धावण्यास सुरुवात करण्यात आली. तेव्हा आमच्या गाड्या फक्त 70 टक्के भरल्या होत्या, परंतु आता बहुतांश गाड्यांमध्ये जवळपास 100 टक्के जागा आरक्षित आहेत. पश्चिम रेल्वेकडून उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि गुजरातपर्यंत गाड्या चालवल्या जातात.

ABOUT THE AUTHOR

...view details