महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा नि: श्वास, कोटा येथून परतीचा प्रवास सुरू - corona in mumbai

शासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या परतीच्या प्रवसासाठी इतर शासकीय बाबी पूर्ण केल्या. त्याचबरोबर एसटी बसेसमधून विद्यार्थ्यांना आणताना कोव्हिड-१९ च्या आरोग्य सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन करण्यात येत असल्याचे परिवहन विभागाने कळवले आहे. राज्यात परतल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणीही करून विलगीकरणही करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास, कोटा येथून परतीचा प्रवास सुरू
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास, कोटा येथून परतीचा प्रवास सुरू

By

Published : Apr 30, 2020, 7:57 PM IST

मुंबई -लॉकडाऊनमध्ये राजस्थानात अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि: श्वास सोडला आहे. कोटा इथून त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आपल्या घराच्या ओढीने निघालेल्या हजारो विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे आभार मानले आहेत.

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील सुमारे अठराशे विद्यार्थी राजस्थानातील कोटा येथे अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांना घेऊन येण्यासाठी पाठविण्यात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आज कोटा येथून रवाना झाल्या. राजस्थानमधील कोटा येथे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी राज्यातून गेलेले हे विद्यार्थी लॉकडाऊनपासून तेथे अडकून होते. त्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली होती. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे राजस्थान शासनाच्या संपर्कात होते. या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून आणण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत प्रयत्नशील होते. या विद्यार्थ्यांचा प्रवास मध्यप्रदेश तसेच गुजरात राज्यांतून होणार असल्याने मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे संबंधित राज्याच्या यंत्रणांशी संपर्कात होते.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास, कोटा येथून परतीचा प्रवास सुरू

शासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या परतीच्या प्रवसासाठी इतर शासकीय बाबी पूर्ण केल्या. त्याचबरोबर एसटी बसेसमधून विद्यार्थ्यांना आणताना कोव्हिड-१९ च्या आरोग्य सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन करण्यात येत असल्याचे परिवहन विभागाने कळवले आहे. राज्यात परतल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणीही करून विलगीकरणही करण्यात येणार आहे.

परिवहन महामंडळाच्या धुळे आगाराच्या सुमारे ७६ बसेस कोटा येथून विद्यार्थ्यांना घेऊन रवाना झाल्या आहेत. दूर अंतराचा प्रवास असल्याने येत्या एक दोन दिवसांत हे विद्यार्थी त्यांच्याशी संबंधित त्या-त्या जिल्ह्यांत पोहचणार आहेत. यादरम्यान महामंडळाने बसेसचे सॅनिटायझेशन, चालकांची पुरेशी संख्या, त्यांची विश्रांती अशा गोष्टींचेही पुरेसे नियोजन करण्यात आले आहे. कोव्हिड-१९च्या आरोग्य सुरक्षा मानकांचे पालन करून सुखरूपपणे घरी परतण्याचा प्रवास सुरू होताना विद्यार्थ्यांच्या आनंद ओसंडून वाहत होता.

ABOUT THE AUTHOR

...view details