महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज..आत्ता..रात्री १२ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर.. - दुष्काळ दाह

टँकरचा धंदा करणारे लोकप्रतिनिधीच पाण्याचा प्रश्न सुटू देत नाहीत असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला. गोदावरी नदी पूर्णतः कोरडी झाल्याने आसपासच्या गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. तर विदर्भातील शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा डॉन चित्रपटातील 'खैके पान बनारस वाला' गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आई-वडिलांनी मुलाची विष पाजून आणि हात-पाय बांधत विहिरीत फेकून हत्या केल्याची घटना धक्कादायक घटना कोल्हापुरात समोर आली आहे. वैद्यकीय प्रवेशाप्रकरणी मराठा विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली, राज यांच्याकडून मदतीचे आश्वासन..

ठाणे

By

Published : May 13, 2019, 11:58 PM IST

टँकरचा धंदा करणारे लोकप्रतिनिधीच पाण्याचा प्रश्न सुटू देत नाहीत - राज ठाकरे

ठाणे - आपण दुष्काळ दौरा करणार नाही, असे स्पष्ट करतानाच दुष्काळात पाणी वाटप करणाऱ्या टँकरच्या लॉबीज कुणाच्या आहेत, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. यामागे जर खासदार, आमदार, नगरसेवक असतील तर तो त्यांचा धंदा आहे आणि त्यांच्या धंद्यासाठीच ते नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटू देत नाहीत, असा गंभीर आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला. (सविस्तर वृत्त)

दुष्काळ दाह : गोदाकाठच्या लोकांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ

औरंगाबाद - गोदावरी नदी पूर्णतः कोरडी झाल्याने आसपासच्या गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. इतकेच नाही तर नदीपात्रात पाणीच नसल्याने नदीतील मासेही तडफडून मरत आहेत. नदीच्या काठच्या गावकऱ्यांना नदी पात्रातील वाळू बाजूला करून खड्डे करून पाणी काढावे लागत आहे. (सविस्तर वृत्त)

दुष्काळी दौरे सोडून महसूल राज्यमंत्र्यांचा चित्रपटातील 'खैके पान बनारस वाला' वर ठेका

यवतमाळ - विदर्भातील शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा डॉन चित्रपटातील 'खैके पान बनारस वाला' गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एकीकडे राज्यात भीषण दुष्काळ असताना त्यासंदर्भात उपाययोजना, दुष्काळ दौरे करण्याऐवजी मंत्री महोदयांनी चक्क गाण्यावर ठेका धरल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. (सविस्तर वृत्त)

धक्कादायक..! दारूच्या आहारी गेलेल्या तरुणाला आई-वडिलांनीच विष पाजून विहिरीत दिले ढकलून

कोल्हापूर - जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथे आई-वडिलांकडूनच मुलाची विष पाजून हात-पाय बांधत विहिरीत फेकून हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलाच्या आई-वडिलांसह मानलेला मामा आणि अन्य दोघांना अटक केली आहे. (सविस्तर वृत्त)

वैद्यकीय प्रवेश: मराठा विद्यार्थ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, राज यांचेकडून मदतीचे आश्वासन

ठाणे - वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्यावर मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी सोमवारी सकाळी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. तर ठाण्यात मराठा विद्यार्थ्यांच्या शिष्ठमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले, यावेळी आपण योग्य त्या ठिकाणी बोलून विद्यार्थ्यांना सहकार्य करू, असे आश्वासन राज यांनी दिले. (सविस्तर वृत्त)

ABOUT THE AUTHOR

...view details