महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता.. रात्री १२ वाजेपर्यंत ठळक घडामोडींवर एक नजर

लातूरमध्ये केमिकल कारखान्यात स्फोट होऊन दोघांचा जागीच मृत्यू.. बंगळुरूहून निघाले होते तस्कर, पुण्यात बिबट्याच्या दोन पिल्लांसह केले जेरबंद..२० वर्षांपासून एक्झिट पोलचे भाकीत चुकतंय, व्यंकय्या नायडूंचे मत.. पाच मतदान अधिकार्‍यांची वेतनवाढ कायमस्वरूपी बंद, लातूर जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई..विवेक ओबेरॉयचे 'ते' ट्विट नेटकऱ्यांकडून धारेवर, राज्य महिला आयोगानेही बजावली नोटीस

लातूर

By

Published : May 21, 2019, 12:07 AM IST

लातूरमध्ये केमिकल कारखान्यात स्फोट; दोन जागीच ठार

लातूर - लातूर-औसा रोडवरील बुधोडा शिवारात ओमॅक्स अॅग्रो नावाचा लिंबोळीपासून खत निर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यात आज संध्याकाळी जुने टायर जाळून केमिकल तयार करण्यात येत होते, त्यावेळी बॉयलरमध्ये जोरदार स्फोट झाला, या स्फोटात दोन जण जागीच ठार झाले.

सविस्तर वृत्त

बंगळुरूहून निघाले होते तस्कर...पुण्यात बिबट्याच्या दोन पिल्लांसह जेरबंद

पुणे - पुणे-सातार रस्त्यावरील खेड शिवापूरला कारमधून २ जिवंत बिबट्याची पिल्ले राजगड पोलिसांनी पकडले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. बंगळूर येथून पुण्यातील कोंढवा परिसरात ते जाणार होते. या बिबट्यांच्या पिलांचे वय ३ महिने आहे. मुन्ना हबीब सय्यद (वय ३१), इरफाझ मेहमूद शेख (वय ३३), आयझ बक्षुलखान पठाण (वय ४०) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

सविस्तर वृत्त

२० वर्षांपासून एक्झिट पोलचे भाकीत चुकतंय - व्यंकय्या नायडू

अमरावती - 'एक्झिट पोल्सनी वर्तवलेले भाकीत १९९९ पासून चुकीचे ठरत आहे. २३ मे रोजी जाहीर होणारे निकाल याहून वेगळे असू शकतात.'यामुळे एक्झिट पोल्सने दिलेला 'कल' निकाल म्हणून पाहता येणार नाही. खरे निकाल वेगळे असू शकतात,' अशी शक्यता भाजपचे माजी नेते आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे.

सविस्तर वृत्त

पाच मतदान अधिकार्‍यांची वेतनवाढ कायमस्वरूपी बंद, लातूर जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई

लातूर - लोकसभा निवडणुकीदरम्यान कामातील कुचराई कर्मचाऱ्यांच्या चांगलीच अंगलट आली. कर्तव्यावरील क्षेत्रीय अधिकारी, केंद्राध्यक्ष व ३ मतदान अधिकार्‍यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ५ अधिकार्‍यांची वार्षिक वेतनवाढ बंद केली आहे. या निवडणुकीतील ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.

सविस्तर वृत्त

विवेक ओबेरॉयचे 'ते' ट्विट नेटकऱ्यांकडून धारेवर, राज्य महिला आयोगानेही बजावली नोटीस

मुंबई - अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या एक्झिट पोलच्या संदर्भात केलेल्या ट्विटचा सध्या चांगलाच वनवा पेटला आहे. या ट्विटमध्ये अभिनेता विवेक ऑबेरॉय याने अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिच्या संदर्भात वापरलेले छायाचित्र आणि त्यावरील कमेंटमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. यासंदर्भात त्याला नोटीस बजावली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सविस्तर वृत्त

ABOUT THE AUTHOR

...view details