राहुल गांधींच्या ट्विटर प्रोफाईलमध्ये बदल, काँग्रेस 'अध्यक्ष' नसून 'सदस्य'
नवी दिल्ली - राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर आपल्या ट्विटर अकांटवरील प्रोफाइलमध्येही बदल केला आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष असल्याची नोंद हटवली आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचे सदस्य एवढीच ओळख प्रोफाईलमध्ये ठेवली आहे. अखेर राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. त्यांनी आठवड्याभरात नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल असे संकेत दिले आहेत.वाचा सविस्तर...
फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्स अॅप डाऊन, डाऊनलोडिंग बंद
नवी दिल्ली - सोशल मिडियावर सर्वात जास्त वापर असणारे फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आज दुपारपासूनच जगभरात डाऊन झाले आहेत. विशेषत: युरोप व अमेरिकेत हे जास्त प्रमाणात जाणवत आहे. व्हॉट्सअॅपवरचे व्हिडीओ आणि फोटो अपलोड होत नसल्याचे अनेकांनी ट्विटरवरून सांगितले आहे. व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक ही तिन्ही एकाच वेळी मंद झाल्याने युजर्सची अडचण झाली आहे. वाचा सविस्तर...
सहकारमंत्र्यांच्या लोकमंगलसह तीन साखर कारखान्यांविरोधात गुन्हा दाखल
सोलापूर - साखर कारखान्यांनी उसतोड कामगार आणि उस वाहतूक करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही. त्यामुळे राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखन्यांसह सोलापुरातील तीन साखर कारखान्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाचा सविस्तर...
मालाड भिंत दुर्घटना : ७ महिन्याच्या चिमुकल्याची अखेर २२ तासानंतर आईशी भेट
मुंबई- मालाड भिंत दुर्घटनेमध्ये भिंतीलगत असलेल्या शर्मा कुंटुबांचे घर उद्धवस्त झाले. यामध्ये ७ महिन्यांचा आयुष आणि त्याच्या आईची ताटातूट झाली होती. मात्र, चिमुकला आयुष वाचला असून अखेर २२ तासानंतर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात माय-लेकराची भेट झाली. वाचा सविस्तर...
..अन् राजू शेट्टी म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाही
पुणे- आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटना 49 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. याबाबत 1 ऑगस्टपर्यंत आघाडी तसेच शिवसेना-भाजपसोडून इतर पर्यायाचा विचार करणार असल्याचे संघटनेच्या कार्यकारणी बैठकीत ठरवण्यात आल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.वाचा सविस्तर...