मुंबई - मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर भाजप पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचे चित्र होते. देवेंद्र फडणवीस यांच्या 'मी पुन्हा येईन' या वक्तव्याची खिल्ली उडवली जात होती. पण अचानक आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात जणू भूकंपच झाला. त्यामुळे महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर खात्यावरून देवेंद्र फडणवीसांचा 'मी पुन्हा येईन'चा तो व्हिडिओ पुन्हा शेअर केला आहे.
मी पुन्हा येईन.... - MaharashtraGovtFormation
देवेंद्र फडणवीस यांच्या 'मी पुन्हा येईन' या वक्तव्याची खिल्ली उडवली जात होती. पण अचानक आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
मुख्यमंत्री
हेही वाचा -दोघे एकत्र आल्याचे कधीही चांगलेच म्हणूनच भाजपसोबत - अजित पवार
विधानसभेच्या निकालानंतर सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या गोंधळात आज मोठा निर्णय झाला. निकालानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चर्चेच्या फेऱ्या काल रात्रीपर्यंत सुरू होत्या. मात्र, अजित पवारांच्यासोबतीने भाजपने सरकार स्थापन केले असून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.