महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MHT CET 2023 Result: एमएचसीईटीचा निकाल कुठे पाहायचा, 'या' आहेत महत्त्वाच्या लिंक - महाराष्ट्र सीईटी

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 2023 चा निकाल आज 11 वाजता जाहीर केला आहे. महाराष्ट्र सीईटी कक्ष आयुक्त वतीने निकाल जाहीर केला जाणार आहे.

MHT CET 2023 result today
सीईटी निकाल

By

Published : Jun 12, 2023, 10:50 AM IST

Updated : Jun 12, 2023, 11:39 AM IST

मुंबई :राज्यात मे महिन्यात झालेल्या सीईटी परीक्षेचा निकाल आज 12 जून रोजी सकाळी 11 वाजता जाहीर झाला आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल फिजिक्स, केमिस्ट्री, गणित (PCM) आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) ग्रुप्ससाठी निकाल जाहीर करेल. महाराष्ट्र सीईटी 2023 बाबत आयुक्त वारभुवन हे निकाल जाहीर करतील.
सकाळी 11 वाजता राज्यातील सीईटी निकाल जाहीर झाला की, केंद्रीय पद्धतीने प्रवेश फेरी सुरुवात देखील होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी शासकीय सीईटी संकेतस्थळ येथे भेट द्यावी.


घरात बसून करा अर्ज :यंदा प्रथमच मोबाईल अ‍ॅपद्वारे सीईटी कक्षाद्वारे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया केली जाणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना घरात बसून अर्ज भरता येईल. कोणत्याही सायबर कॅफेमध्ये न जाता हे काम मोबाईलद्वारे सहज होईल, अशी सोय शासनाने केली आहे. प्रवेश प्रक्रिया राबविताना अ‍ॅप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस प्रणालीचा उपयोग केला जाईल. त्याद्वारे बारावी गुण, रहिवासी व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलीअर प्रमाणपत्र, कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीत लागणारा 7/12 उतारा, प्रवेश प्रक्रियेसाठी उपयुक्त प्रमाणपत्र यांची पडताळणी करण्यात येणार आहे.


सीईटी परीक्षा दोन सत्रांत :राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमएचटी सीईटी 9 ते 21 मे या कालावधीत घेण्यात आली. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ग्रुपची (पीसीएम) परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान घेण्यात आली होती. तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुपची (पीसीबी) परीक्षा 15 ते 20 मे या कालावधीत पार पडली होती. पीसीएम आणि पीसीबीच्या परीक्षा दोन सत्रांत घेतल्या होत्या. पहिल्या सत्राची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 तर दुसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत झाली होती.


समस्या व शंकांचे निरसन : केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. मग प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून देण्यात येणारे मान्यतेबाबत संस्था, महाविद्यालये तसेच विद्यार्थीच्या लॉगीन आयडीमध्ये सांगितले जाणार आहेत. तसेच शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन पालक तसेच उमेदवारांच्या समस्या व शंकांचे निरसन केले जाईल.


हेही वाचा :

  1. MHT CET Result 2023: महाराष्ट्र सीईटी 2023 चा निकाल आज जाहीर होणार
  2. MAH MBA CET 2023 चे निकाल जाहीर; येथून डाऊनलोड करा तुमचा निकाल
  3. Maharashtra SSC Result 2023 : दहावीला किती मार्क मिळाले? 'असा' पहा निकाल
Last Updated : Jun 12, 2023, 11:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details